सौ. सपना रोशन भगत: महिला मोर्चा अध्यक्ष, दिवा मंडळ – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
जेव्हा खऱ्या अर्थाने समाजसेवेची आणि पक्षनिष्ठेची चर्चा होते, तेव्हा सौ. सपना रोशन भगत यांचे नाव आपसूकच समोर येते. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि वाणीत गोडवा यांचा सुंदर संगम म्हणजे आमच्या सपना ताई! भारतीय जनता पार्टीच्या दिवा मंडळातील महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामातून एक आदर्श निर्माण केला आहे.
माझा आणि सपना ताईंचा परिचय तसा नवखा असला, तरी त्यांच्या कार्याची ख्याती मला माझ्या बहिणीकडून आणि नातेवाईकांकडून ऐकायला मिळाली. सुरुवातीला विश्वास बसत नव्हता की एक व्यक्ती एवढ्या सातत्याने आणि जोमाने समाजासाठी काम करू शकते. पण जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा त्यांच्या साध्या-सोप्या पण प्रभावी बोलण्याने आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेने माझे मन जिंकले. “काय भाऊ, कसे आहेत?” अशी आपुलकीची सुरुवात आणि लगेचच कामाच्या मुद्द्यावर येण्याची त्यांची शैली मला खूपच आवडली. यातून त्यांचा आदर आणि कामाप्रती असलेली गंभीरता दिसून येते.
सपना ताईंच्या सोशल मीडियावर डोकावलं, तर त्यांचे कार्य किती व्यापक आहे, याची जाणीव होते. स्वच्छता मोहीम, रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर, आरोग्य शिबिरे, महिलांच्या समस्यांचा पाठपुरावा – हे सगळं त्यांच्या पोस्टमधून आणि प्रत्यक्ष कामातून दिसतं. त्यांचं दिवा येथील कार्यालय म्हणजे ३६५ दिवस चालणारं समाजसेवेचं केंद्रच! मतदार नोंदणीपासून ते छोट्या-छोट्या कार्यक्रमांपर्यंत, तिथे नेहमीच महिलांची आणि कार्यकर्त्यांची वर्दळ असते. हे सगळं पाहून एकच गोष्ट लक्षात येते – सपना ताईंनी महिला मोर्चा अध्यक्षपदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.
दिवा परिसरातील अनेक समस्यांना त्यांनी हात घातला आहे. उदाहरणच द्यायचं, तर निकृष्ट दर्जाचं खान मुलांना दिलं जात होतं, याचा त्यांनी पर्दाफाश केला. तसंच, परिसरात महिला कॉन्स्टेबल नव्हत्या, तेव्हा त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ती सुविधा उपलब्ध करून दाखवली. खरंच, त्यांच्या या जिद्दीला आणि समाजसेवेच्या वृत्तीला सलाम!
सपना ताईंच्या यशामागे त्यांचे पती, श्री. रोशन भगत यांचा मोलाचा वाटा आहे. भाजपा मंडळात काम करणारे रोशनजी ताईंच्या प्रत्येक पावलाला साथ देतात. त्यांचं नियोजन, सल्ला आणि आधार यामुळे सपना ताईंची राजकीय वाटचाल अधिक बळकट झाली आहे. त्यांच्या कार्यसंघात विठ्ठल गावडे यांच्यासारखे जोशाने आणि चतुराईने काम करणारे कार्यकर्तेही आहेत, जे त्यांच्या डिजिटल उपस्थितीला आणखी प्रभावी बनवतात आणि ऑफिस घराप्रमाणे सांभाळणारी प्रियांका ताई देखील ऑफिस स्वतःच समजून कामाला न्याय देत असते आणि अर्थातच, मंडळ अध्यक्ष श्री. सचिनजी भोईर यांच्यासारखा खंबीर आधार या संपूर्ण संघाला आहे. हे सगळं एका कुटुंबासारखं एकत्र काम करतं, हे पाहून खरंच अभिमान वाटतो.
दिवा हा भाग राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. महानगरपालिका निवडणुकीत तो ठाण्यात येतो, पण आमदारकी आणि खासदारकीसाठी कल्याणचा. या जटिल परिस्थितीत सपना ताईंनी गेल्या दोन निवडणुकांत पक्षासाठी अथक परिश्रम घेतले. आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना साथ मिळणं गरजेचं आहे. त्यांनी डिजिटल माध्यमांचा आणि मोठ्या कार्यक्रमांचा पुरेपूर उपयोग करून दिव्यात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे.
सपना ताईंसारख्या समाजासाठी झटणाऱ्या, आमदारासारख्या जोमाने काम करणाऱ्या व्यक्तीला साथ द्या. निवडणुकीत गोड बोलून नंतर गायब होणाऱ्यांपासून सावध राहा. जनतेच्या हितासाठी योग्य व्यक्तीला निवडा, जेणेकरून दिव्यात सकारात्मक बदल घडतील. सौ. सपना ताई भगत आणि श्री. रोशनजी भगत यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा! मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, आणि कधीही हक्काने हाक मारली, तर हजर असेन!
दिव्याची जनता लवकरच ठरवेल, कोण आहे खरा सेवक!
© प्रणय प्रिया प्रकाश गांवकर
.